लग्न करतो असे म्हणून जबरदस्ती शरीर संबंध ठेवल्याची घटना दिघी परिसरात घडली आहे. या प्रकरणी महिला फिर्यादीने दिघी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
विकास राजेंद्र पवार ( वय 28 ),बाळू राजेंद्र पवार आणि तीन महिला अशी आरोपींची नावे आहेत.
५ मे रोजी फिर्यादीचा विकास बरोबर साखरपुडा झाला होता. आरोपीने फिर्यादी हीस आळंदी येथील एका लॉज येथे नेऊन लग्न करतो असे म्हणून जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादीने लग्नाची मागणी केली असता आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. तसेच वारंवार लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे भाष्य केले.
२२ एप्रिल रोजी फिर्यादी ही तिच्या मामाच्या घरी असताना एका महिला आरोपीने तिच्या उजव्या हातावर खलबत्ता मारून हात फ्रॅक्चर केला.विकास,त्याची आई आणि भाऊ या तिघांनी मिळून फिर्यादीला हाताने मारहाण करत शिवीगाळ केली.तसेच १३ मे रोजी फिर्यादीची आई व बहीण यांना फिर्यादीच्या लग्नाच्या कारणाहून वरील आरोपी यांनी हाताने मारहाण केली.
आरोपींवर भादवी कलम ३७६, ३७६, २, एन ३५४, अ ३२५, ३२३, ५०४, ५०६, 34 च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिखरे हे करत आहेत.












