एमपीएससीकडून घेण्यात येणारी प्रत्येक परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते. परंतु एमपीएससी बोर्ड विद्यार्थ्यांची परीक्षा पाहत असल्याचे दिसून येत आहे. एमपीएससी बोर्डाने पुन्हा गोंधळ तयार निर्माण केला आहे.
एकाच दिवशी तीन परीक्षा होणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या दोन संधी वाया जाणार आहेत. एसपीएससीच्या तीन परीक्षा १७ डिसेंबरला एकाच दिवशी होत आहे. एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या गट क क्लार्क, टॅक्स सहायक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाची परीक्षा एकाच दिवशी आली आहे.
या तिन्ही परीक्षा १७ डिसेंबरला एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक परीक्षा वेगवेगळ्या तारखांना घेण्याची मागणी केली आहे. मंडळ वेळापत्रक तयार करताना एकाच दिवशी तीन परीक्षांचे आयोजन कसे करते? मंडळाकडून विद्यार्थ्यांचा काहीच विचार होत नाही का? असे प्रश्न आता विद्यार्थी विचारत आहे.












