पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १६ : पुणे शहरातील एकूण दहा वाहनांची चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका चोरीला गेलेल्या वाहनाच्या संदर्भात मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालण्यात आली होती. यादरम्यान यापूर्वी वाहन चोरीच्या गुन्ह्यात पकडलेला आरोपी जात असल्याचे दिसले. त्याला थांबवून वाहन चोरी बद्दल विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
त्यानंतर मुंढवा पोलीस स्टेशन मधील त्याचा अभिलेख पाहिला असता ज्या गुन्ह्याचा पोलीस तपास करत होते तो गुन्हा यानेच केला असल्याची खात्री पोलिसांना पटली. त्याची पालकां समक्ष चौकशी केली असता त्याने हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतून ०५, मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतून ०४ व लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतून ०१ अशा एकूण दहा वाहनांची चोरी केली असल्याचे कबूल केले. त्याच्याकडून एकूण दोन लाख पंचाहत्तर हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दहा वाहनांच्या गुन्ह्याची उकल सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, श्री.आर. राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे, श्रीमती, अश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाणे पुणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्रीमती. संगिता रोकडे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, संदिप जोरे, पोलीस अंमलदार, दिनेश राणे, संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्ग, राहुल मोरे, स्वप्नील रासकर, सचिन पाटील यांनी केली आहे.












