आजकाल कोण कशाचे आमिष दाखवेल आणि आपण त्यास कसे बळी पडू हे सांगता येत नाही(Crimes in pune).प्रत्येक गोष्टीचे आपल्याला ज्ञान नसते याचाच फायदा घेत आरोपी फसवणुकीचे प्रकार करत असतात.अशीच एक घटना भोसरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
एका महिला फिर्यादीने तीन इसमांविरुद्ध भोसरी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिला हीचेकडून दि.०३ रोजी सायं.०४:३० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर,फुगे प्रायमा,दिघी रोड,भोसरी,पुणे येथून तीन आरोपींनी ५०,००० किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व ५०० रू. रक्कम घेतली.आणि त्याच्या बदल्यात पिवळ्या धातूचा तुकडा देऊन फिर्यादी यांची फसवणुक केली.
आरोपींवर भादवी कलम ४२०,३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेले नाही.सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मोहारे हे करत आहेत.












