मा. पोलीस आयुक्त सो. पिंपरी चिंचवड यांनी अवैध शस्त्रे विक्री करणारे व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांना अटक करण्याचे आदेश दिलेले होते(pune-crime).त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे दि.०२/०६/२०२३ रोजी पुनावळे, पुणे परिसरात पेट्रोलिंग करुन माहीती घेत होते.
पोलिस हवालदार जगदाळे व पोलिस नाईक गैंगजे यांना त्यांचे बातमीदाराकडुन माहिती मिळाली होती.मिळालेल्या बातमीवरून आरोपी इसम नामे उमेश चंद्रकांत केदारी ( वय २७ वर्षे, रा. गणेश बेलेरोजा सोसायटी, फलॅट नं. बी/ ५०१, कोयतेवस्ती, पुनावळे, पुणे )यास कोयतेवरती चौकात असलेल्या एस.के. वडेवाले या दुकाणाचे समोर पुनावळे, पुणे या हॉटेल वजा टपरी समोरुन ताब्यात घेतले.त्याच्या जवळून ५१,०००/- रु. ०१ गावठी पिस्तुल मॅग्झीनसह व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
सदर आरोपीच्या विरोधात रावेत पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक २२८/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करुन त्यास रावेत पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपीस मा. न्यायालयात हजर करून त्याची दि.०५/०६/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे. अटक आरोपीवर पुर्वी भादवि ३०२, १४३, १४७, १४८, १४९आर्म अॅक्ट कलम ४.२५.महा.पो.का. कलम ३७ (१) (३) सह १३५ कलम अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे जो मा. पोलीस सह आयुक्त डॉ. श्री. संजय शिंदे सो., मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सौ. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, पोलीस अंमलदार विक्रम जगदाळे, नितीन गेंगजे, व रामदास मोहीते यांनी केली आहे.












