बनावट ओळख सांगून आजकाल लोकांची लूट होताना दिसते. पण एक व्यक्ती आय. ए. एस (IAS) होता आले नाही म्हणून आय. ए. एस असल्याचे म्हणून सांगत होता. बॉर्डर लेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेने जम्मू कश्मीर येथे ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा औंध येथे आयोजित केला होता. या सोहळ्यात संस्थेचे ट्रस्टी व सदस्य विरेन शहा, सुहास कदम, पिके गुप्ता, प्रकाश गोरे, गोसावी, समाधान कदम आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पाहुणे म्हणून आलेला हा इसम आपली ओळख विनायक देब आय.ए.एस असल्याचे सांगत होता. त्याचबरोबर आपण दिल्ली येथे डेप्युटी सेक्रेटरी पंतप्रधान कार्यालयात असल्याचे त्याने सांगितले. कार्यक्रमातील नागरिकांना या व्यक्तीवर संशय आल्यामुळे त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांना कळवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी युनिट एक मधील सहाय्यक पोलीस आशिष कवठेकर आणि एक अंमलदार यांची टीम करून त्यांना मार्गदर्शन केले. मोबाईल लोकेशन ट्रॅक केले असता तळेगाव दाभाडे मध्ये असल्याचे दिसले. मोहन नगर तळेगाव दाभाडे येथील एका बिल्डिंग मधल्या फ्लॅटमध्ये हा व्यक्ती भेटला. त्याला त्याचे नाव विचारले असता त्यांनी नाव विनय देब वय 54 असे सांगितले. पुन्हा पोलिसांनी या व्यक्तीस विश्वासात घेऊन तपासणी केली असता त्याचे खरे नाव वासुदेव निवृत्ती तायडे रा.मु.पो किनगाव ता. यावल जि. जळगाव व शिक्षण बीकॉम एम ए असे सांगितले.
सदर इसमास ताब्यात घेऊन युनिट १ पुणे शाखा कार्यालय येथे आणून ही व्यक्ती कार्यक्रमात असून लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी चातूर्शृंगी पोलीस स्टेशन मध्ये भादविक १७०,४१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर आरोपीने आणखी गुन्हे केले असल्याचा दाट शक्यता आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर युनिट १ हे करत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री संदीप कर्णिक मा. अप्पर आयुक्त पोलीस ,गुन्हे , श्री रामनाथ पोकळे श्री सुनील पवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ ने केली.












