पुणे । प्रतिनिधी
पुणे, दि.२७ : पिंपळे गुरव येथील एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी (दि. २५) रात्री नऊ वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.
सुरज श्रावण बर्गे (वय २२, रा. आनंद पार्क, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज याने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी सूरज याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुरज याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून सांगवी पोलीस तपास करीत आहेत












