मावळचे लोकप्रीय आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील भोयरे फाटा ते कल्हाट फाटा या रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्प – २०२३ अंतर्गत सुमारे १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचा भूमिपूजन स्थानिक मान्यवरांच्या हस्ते बुधवार (दि. २९) रोजी करण्यात आले.
दोन किलोमीटरच्या या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. भोयरे फाटा ते कल्हाट फाटा रस्ता चांगला व्हावा अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. सदर मागणीची दखल घेत सद्यस्थितीत ३.७५ मीटर असलेला रस्ता ५.५० मीटर करुन रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार असल्याने येथील ग्रामस्थांनी आमदार शेळके यांचे आभार मानले आहेत.
प्रशस्त रस्ता झाल्यानंतर या भागातील दळणवळणास देखील अधिक गती मिळणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस संघटन मंत्री नारायण ठाकर, ह.भ.प. रोहिदास धनवे, मा.सरपंच विठ्ठल जाधव,बाबाजी गायकवाड, सरपंच कल्हाट शिवाजी करवंदे,उपसरपंच देवदास धनवे,सरपंच निगडे भिकाजी भागवत, उपसरपंच गणेश भांगरे, सरपंच भोयरे अमोल भोईरकर, उपसरपंच ऋषिकेश भोईरकर, नवनाथ पडवळ, माणिक तांबोळी, मोहन घोलप,संतोष करवंदे,मनोज करवंदे, तानाजी करवंदे, रवि पवार, भाऊसाहेब धनवे , बळिराम भोईरकर, किसान सेल अध्यक्ष दुंधाजी अगिवले, सोमनाथ अगिवले, मनिषा पवळे, रंजना पवार, धोंडिबा भागवत, किसन यादव, रामदास धनवे,संजय देशमुख, भागाजी यादव,शंकर कल्हाटकर आदि.मान्यवर उपस्थित होते.












