नमस्कार,
नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंच्या घटनेनंतर जन आरोग्य अभियानाने 27 ऑक्टोबर 2023 पासून राज्यव्यापी आरोग्य हक्क मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत राज्यभर जिल्हा आरोग्य हक्क परिषदा घेण्यात येत आहेत. या परिषदांमध्ये सरकारी रुग्णालयांच्या सेवा-सुविधांचे प्रश्न व त्या सोडवण्यासाठीचा कृती कार्यक्रम मांडला जात आहे. नांदेड, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, सांगली पाठोपाठ येत्या शुक्रवारी, 12 जानेवारी 2024 पुण्यात आरोग्य हक्क परिषद घेत आहोत. श्रमिक भवन येथे सकाळी 11 ते 3 या वेळेत ही परिषद होईल.
आपल्या सर्वांना या परिषदेसाठी आमंत्रित करत आहोत.
नक्की या.
आरोग्य हक्क परिषदेला नक्की या












