इंदोर : रविवार दि. 16 सप्टेंबर रोजी इंदोर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करण्यात आले. माननीय देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत इंदोर येथील प्रसिद्ध उद्योजक आणि मराठवाड्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी संकटमोचनाची भूमिका बजावणारे परमेश्वर नाना येवले यांनी स्वतः उपस्थित राहून केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री सध्या इंदोर दौऱ्यावर आहेत. सध्याचा राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्वपूर्ण आहे. आज देखील मा. उपमुख्यमंत्री यांचा इंदोर मध्ये दौरा सुरू आहे.












