यंदाच्या अपुऱ्या व अवेळी झालेल्या पावसाचा कमी-अधिक फटका खाद्यतेल उत्पादनावर झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून नवीन शेंगदाणा तेल बाजारात येण्यास किमान महिन्याभराचा उशीर झाला आहे.
या पार्श्वभूमीवर सोयाबीन रिफाईंड, सूर्यफूल तसेच सरकी रिफाईंड तेलाचे दर लिटरमागे १०० रुपयांवरुन १०५ रुपयांपर्यंत गेले आहेत; म्हणजेच या तीन प्रकारच्या खाद्यतेलांत लिटरमागे पाच रुपयांनी दरवाढ झाली आहे.
करडी; तसेच शेंगदाणा तेलाचे दर १८० ते १८५ रुपयांवर कायम आहेत. दरम्यान, नवीन शेंगदाणा तेलाची आवक सुरू झाल्यावर या तेलाचे दर लिटरमागे किमान १० ते २० रुपयांनी घटू शकतात, अशीही शक्यता खाद्यतेलाचे व्यापारी जगन्नाथ बसैये यांनी व्यक्त केली आहे.












