नवी दिल्ली : नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला. राजधानी दिल्लीमधून एक मोठी घटना समोर आली आहे. नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात हेमंत गोडसे यांना गंभीर दुखापत झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे आज राजधानी दिल्लीमध्ये आहेत. नवी दिल्लीमधील संसदेतील शिव जयंती उत्सव आटोपून हेंमत गोडसे हे आपल्या इनोव्हा कारमधून (क्र. MH 15 FC 9909) निवास्थानी जात होते.
यावेळी दिल्लीतील बी डी मार्गावर त्यांच्या गाडीला एका भरधाव ईर्टिगा कारने (DL 7CW 2202) जोरदार ध़डक दिली. या अपघातात खासदार हेमंत गोडसे हे सुखरुप आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र त्यांच्या इर्टिगा कारचे मोठे नुकसान झाले आहे.
ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे.












