पुणे । प्रतिनिधी
पुणे दि. ०२ : रावेत गावच्या हद्दीत, बंगलोर मुबई हायवे वर राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग यांनी सोमवार (दि. ०१) रोजी पहाटे ०४ वाजेच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावार गोव्यातून पुण्यात विक्रीसाठी आणलेला ७४ लाख ५६, हजार २००रुपये किमतीचा विदेशी दारू साठा जप्त केला.
ही दारू विक्रीसाठी आणणाऱ्या विजय चंद्रकांत चव्हाण वय ५३ वर्षे, रा. सातारा व सचिन निवास धोत्रे, बप ३१ वर्ष, रा. सांगली या दोन आरोपी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण व धोत्रे यांनी अवैधरीत्या गोवा राज्यातून पुण्यात विदेशी मद्यसाठा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणला होता. याबाबत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी कारवाई केली.
यावेळी चव्हाण,व धोत्रे हा अवैधरित्या आणलेल्या मद्याची वाहतूक करताना मिळून आला. पोलिसांनी या कारवाईत ७२ लाख ५६ हजार २०० रुपये किमतीचा मद्यसाठा व भारत बेझ कपनीचा ३७२३ आर हा १४ चाकी वाहन क्र. एम एच १५ एफ व्ही ८९४० असे एकुण १ कोटी १९ लाख ९२ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या दोन्ही आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), ८३ व १०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले असता दि. ०४ पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे.
सदर कारवाई अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांच्या अधिनस्त असलेल्या निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ विभाग व सासवड विभाग, पुणे या कार्यालयाने केलेली आहे. या पुढे सुध्दा अवेध मद्य निमिती, वाहतुक व विक्री विरुध्द नियमित कारवाई सुरु राहणार असून पुणे जिल्हयामध्ये कोणत्याही नागरीकास अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी टोल फ्री. क्र. 18002339999 व द्रध्वनी क्र. 020-26058633 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्यात यावी असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे चरणसिंग राजपूत यांनी केलेले आहे.












