पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.15 : सोमवार पेठेतल्या कृष्णाई अपार्टमेन्ट मध्ये घरफोडीची घटना समोर आली आहे. ही घटना दि.१२ ते १४ ऑगस्ट दरम्यान घडली आहे. या प्रकरणी एक महिलेने अज्ञात आरोपी विरोधात समर्थ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
सदर आरोपीने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत दरवाज्याचे लॉक तोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्दे माल घेऊन पसार झाले आहेत. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुनील रणदिवे करीत आहे.
घरफोडीचे सत्र पुन्हा सुरु; सोमवार पेठेतील घटना












