पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १६ : 2023 हे वर्ष जगभरातील सर्वच पत्रकारांसाठी वाईट ठरले आहे. या वर्षभरात जगभरातील ९४ पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला व एकूण ४०० पत्रकारांना तुरुंगाची हवा खावी लागली. यामध्ये हमास – इस्राईल युद्धामध्ये ६८ तर युक्रेन युद्धात १२ पत्रकार मारले गेले आहेत. तर जेलची हवा खावी लागणाऱ्या मध्ये चीनचे ८०, म्यानमारचे ५४, तुर्कीचे ४१, रशियाचे ४०, बेलारूसचे ३५ आणि आणि इजिप्तच्या २३ पत्रकारांचा समावेश आहे. ही माहिती इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्टस् या संस्थेकडून देण्यात आली आहे.
या संस्थेकडून 2023 मध्ये मारल्या गेलेल्या पत्रकारांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. पत्रकारांना संरक्षण देण्याची आणि त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची जास्त गरज आहे. याआधी कधीच अशी वेळ आली नाही असे मत इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जनरलिस्टस् या संस्थेकडून मांडण्यात आले.












