डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च आकुर्डी येथील इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकामुनिकेशन विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. आर अरोकिया प्रिया चार्ल्स यांना इंडियन इन्स्टिट्यूट फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) या संस्थेचा महाराष्ट्र आणि गोवा विभागाकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट महिला प्राध्यापिका पुरस्कार प्राप्त झाला. डॉ प्रिया चार्ल्स या मागील 22 वर्षां पासून डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्यूट मध्ये येथे विद्यादानाचे अविरत कार्य करत आहे. डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च प्राचार्य डॉ अनुपमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये पीएचडी प्राप्त केली असून त्यांनी आता पर्यंत 60 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. आठ पुस्तके लिहिली असून चार पेक्षाअधिक संशोधन अनुदान प्रस्ताव यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. तसेच डिजिटल इमेज प्रोसेसिंग, पॅरलल कॉम्प्युटिंग, व्हीएलएसआय आणि मशीन लर्निंग या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केले आहे.
डॉ. आर अरोकिया प्रिया चार्ल्स यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकामुनिकेशन क्षेत्रातील ज्ञानाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) या संस्थेने त्यांना सर्वोत्कृष्ट महिला प्राध्यापिका या पुरस्काराने सन्मानित केले. संस्थेच्या प्राध्यापकांना संशोधनासाठी उत्तेजन देणारी धोरणे, नावीन्यपूर्ण अभ्यास पद्धती, विविध नामांकित ऊद्योगक्षेत्राशी असलेले समंजस्य करारामुळे होणारे प्राध्यापकांचे प्रशिक्षण अश्या अनेक उपक्रम प्राध्यापकांच्या विकासासाठी संस्थेद्वारे राबवण्यात येतात.
याप्रसंगी छ संभाजीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात आयएसटीई महाराष्ट्र अँड गोवा चे विभागीय अध्यक्ष डॉ रणजीत सावंत ,आयएसटीई न्यू दिल्ली चे अध्यक्ष डॉ प्रताप सिंह देसाई,डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ के व्ही काळे तसेच डॉ व्ही एम मोहितकर आदी उपस्थित होते.
मिळालेल्या पुरस्काराबद्दल डी. वाय. प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस एस. पाटील , संस्थेचे चेअरमन सतेज डी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील,
शैक्षणिक संकुलाचे संचालक रिअर ऍडमिरल अमित विक्रम,
कुल सचिव वाय के पाटील, प्राचार्य डॉ अनुपमा पाटील,उपप्राचार्य डॉ सुनील डंबारे प्राध्यपक, शिक्षकइतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.












