पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील ‘बहिणाबाई चौधरी वाङ्मय मंडळ’ आणि स्नेहवर्धन प्रकाशन,पुणे यांच्या वतीने 9 डिसेंबर 2023 रोजी ‘कथावाचन मैफिल’ पार पडली.
या मैफिलीचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक माननीय ‘न.म.जोशी’ यांनी केले. याप्रसंगी मैफिलीचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. अरुण आंधळे, स्नेहवर्धन प्रकाशाच्या प्रमुख डॉ. स्नेहलता तावरे आणि प्रसिद्ध दूरचित्रवाणी निवेदिका. स्वाती पाटणकर या उपस्थित होत्या. या मैफलीमध्ये प्रस्थापित आणि नवोदित लेखकांनी त्यांच्या कथा सादर केल्या या मैफिलीमध्ये प्रा. डॉ.संगीता घोडके, जयश्री संगीतराव, मंजिरी एंडाईत, शिवव्याख्याता सुलभा सत्तूरवार, श्री. जयवंत अवघडे, रिझवाना कश्यप, मंगला बाकरे, वर्षा जोशी, प्रा.डॉ. बाळासाहेब दिघे, डॉ. मृणालिनी गायकवाड, शुभांगी मांडे (खारकर) वैशाली गावंडे, तुषार पाटील व संगीता कदम सहभागी झाले.
प्रत्येकाने त्यांच्या कथेचे वाचन केले व अत्यंत बहारदार उपक्रम झाला. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सविता पाटील व प्रा. सायली गोसावी यांनी केले तर प्रसिद्धी प्रा.गौरव जाधव यांनी पार पाडले अनेक क्षेत्रातील विद्यार्थी, साहित्यिक तसे प्रशिक्षक उपस्थित होते.












