पुणे : वानवडी,महंमदवाडी रोड, हडपसर परिसरात दहशत निर्माण करणार्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केलेली हि ३२वी कारवाई आहे.
विराज जगदीश यादव (25, रा. आनंदनगर, हडपसर), यश सुनिल ससाणे (22, रा. सय्यदनगर, हडपसर), चेतन बाळु जाधव (21, रा. ससाणेनगर, हडपसर), गुफ्या उर्फ गुफरान उर्फ मतीन फिरियाज खान (21, रा. हडपसर), गुलाम गौस मुस्तफा खान (21, रा. हडपसर), अक्षय नाथनाथ कांबळे (23, रा. हडपसर) आणि अथर्व नंदु शेंडगे (20, रा. विठ्ठलनगर, हडपसर) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यश सुनिल ससाणे आणि गुफ्या उर्फ गुफरान उर्फ मतीन फिरियाज खान या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून बाकीचे आरोपी फरार आहेत.
पोलीस तपासात आरोपी विराज यादव याने टोळीचे नेतृत्व करत आपले वर्चस्व गाजवण्याचा हेतूने तसेच त्यातून आर्थिक फायदा मिळण्याच्या अनुषंगाने हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव वानवडी पोलिसांकडून आयुक्तांना पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून हि कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले, पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले, पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव शेलार पोलिस अंमलदार मनोज साळुंखे, अमोल घावटे, उत्तरेश्वर धस यांनी केली आहे.
दहशत निर्माण करणार्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई












