पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०८ : दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. ही घटना विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. आदित्य नितीन बद्यप ( वय २२, रा. साप्रसलाईन बाजार, पूर्व खडकी, पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसोबत चंदन नगर, खडकी, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार, लोखंडी रॉड यांसारख्या धारदार हत्यारांच्या सहाय्याने चोरी, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे या प्रकारचे अनेक गंभीर स्वरूपातील गुन्हे केले आहेत.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांच्या आदेशावरून आरोपीस एम. पी. डी. ए कायद्या अंतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे एका वर्षाकरिता स्थानबद्ध केले आहे.
ही कामगिरी श्री. दत्तात्रय भापकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, पुणे, श्री. चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे अधिपत्याखालील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.












