दिल्ली : आज आपला भारत देश ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. नुकतीच दिल्लीतील कर्तव्य पथावर परेडला सुरूवात झाली. असून ही सुरूवात ‘आवाहन’ नाने झाली आहे.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच या कर्तव्य पथावर १०० हून अधिक महिला कलाकारांनी भारतीय वाद्ये वाजवून या परेडची सुरूवात केली आहे. या महिला कलाकारांच्या वाद्यांमध्ये शंख, नादस्वरम, नगाडा, ढोल-ताशा इत्यादी पारंपारिक वाद्यांच्या मदतीने या परेडची सुरूवात करण्यात आली आहे.
या महिलांच्या वाद्य पथकामध्ये महाराष्ट्रातील चिपळूणचे विघ्नहर्ता महिला वादक पथक सहभागी झाले आहे. या महिलांनी ढोल-ताशा, शंख इत्यादी वाद्ये वाजवत या परेडची सुरूवात केली. एएनआयने या संदर्भात ट्विट केले असून याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.












