पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०७ : नवऱ्याने ओढणीने गळा आवळून बायकोचा खून केल्याचा प्रकार शवविच्छेदनातून समोर आला आहे. समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
शफिक सुकरूल्लाह चौधरी याची पत्नी नुरजहा शफिक चौधरी यांचा दि. ०५ रोजी मृत्यू झाला होता. समर्थ पोलीस स्टेशन कडून त्यांच्या मृत्यूची चौकशी सुरू होती. या दरम्यान त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्यांच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यात त्यांच्या मृत्यूचे कारण गळ्याभोवती असलेला व्रण होता.
पोलिसांना याबाबत त्यांच्या नवऱ्यावर संशय आल्याने त्यांनी त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने बायकोशी वारंवार होणाऱ्या भांडणामुळे तिचा गळा ओढणीच्या साह्याने आणून खून केले असल्याचे कबूल केले.
आरोपीवर भादवि कलम ३०२ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय माळी हे करीत आहेत.












