पत्रकारांच्या उपजिविकेला लक्ष्य करणाऱ्या कारवाईवर तीव्र आक्षेप
६ प्रमुख पत्रकार संघटनांकडून तीव्र शब्दात निषेध
न्यूयॉर्क टाइम्स मध्ये लिहिल्या गेलेल्या एका ओळीवरून भारत सरकारनं न्यूजक्लीक या दिल्लीस्थित ऑनलाईन माध्यमसंस्थेवर यावर्षी ऑक्टोबरमध्ये कार्यवाही केली होती, ज्यात न्यूजक्लीकचं कार्यालय सील करण्यात आले होते.
या कारवाईनंतर न्यूजक्लीकने जाहीर केलेल्या पत्रकानुसार १८ डिसेंबर पासून न्यूजक्लीकची सर्व बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत , ज्यामुळं त्यांना कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर आवश्यक खर्चदेखील करणं अशक्य झालेलं आहे.
दरम्यान देशभरातल्या ६ प्रमुख पत्रकार संघटनांनी याबाबत पत्रकाद्वारे तीव्र शब्दात निषेध नोंदवला . प्रेस क्लब ऑफ इंडिया , इंडियन विमेन्स प्रेस कोर , दिल्ली युनियन ऑफ जर्नलिस्ट्स , प्रेस असोसिएशन , केरला युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स आणि वर्किंग न्यूज कॅमेरामॅन्स असोसिएशन या संघटनांनी अशाप्रकारे पत्रकारांच्या उपजिविकेला लक्ष्य करणाऱ्या कारवाईवर तीव्र आक्षेप नोंदवले आहेत.












