पुणे, दि. ०१ : संगीतकार राम कदम यांचे शिष्य, प्रसिद्ध तालवादक पंडित राजेंद्र बाबासाहेब दूरकर यांचा 65व्या शाहीर सगनभाऊ कलाभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. क्षेत्र जेजुरी येथे शीघ्रकवी सगनभाऊ जेजुरीकर उत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात मार्तंड देवस्थानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
राजेंद्र दूरकर 40 वर्षांपासून सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. रंगभूमीवरील कार्यक्रम, मालिका, दूरदर्शनवरील संगीत विषयक कार्यक्रम, चित्रपट संगीत विषयक कार्यक्रमात ते दिग्गज कलाकारांच्या साथीला असतात. लोककलाकारांपासून अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी साथ केली आहे. दूरकर यांच्या संगीत क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.












