पुणे: शनिवार दि ०४ रोजी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन सन २०२३-२४ च्या बिनविरोध निवडून आलेल्या प्रथमच महिला अध्यक्ष पदी ॲड. प्रमिला हरीश गाडे तसेच उपाध्यक्ष म्हणून ॲड. गोरख भागवत कुंभार, सचिव म्हणून ॲड. अक्षय भगवान केदार, महिला सचिव ॲड. वर्षा मधुकर कांबळे, सहसचिव ॲड. श्रीराम राजाराम गालफाडे, खजिनदार पदी ॲड. ऐश्वर्या धर्मराज शिरसाठ, ऑडिटर पदी ॲड. संतोषी संजय काळभोर, तसेच सदस्य पदी ॲड. जयेश उत्तम वाकचौरे, ॲड. तेजस कालिदास चवरे, ॲड. विशाल आसाराम पौळ, ॲड. साक्षी भरत धुमाळ, ॲड. गीतावली मच्छिंद्र जाधव, ॲड. निलम सुनील जाधव यांची निवड झाल्यामुळे त्याच्या सत्कार आमदार अण्णासाहेब बनसोडे यांनी केला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच कोर्टातील कामे त्यांच्या मदतीने पूर्ण करण्याचे आशवासनही दिले.
पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार शहराला जादा कोर्ट मिळण्यासाठी, वकिलांच्या विविध समस्या, तसेच मोशी येथील जागेत लवकरच कोर्टाचे भूमिपूजन सोहळा पार पडणार असून जलदगतीने नविन कोर्टाच्या इमारतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष. प्रमिला गाडे यांनी दिले आहे.












