पुण्यातील मद्यप्रेमींना शासनाने खुशखबर दिली आहे. येत्या २४, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबरच्या रात्री, वाईन शॉप मध्यरात्री १ पर्यत सुरू राहणार आहेत. तर बीअर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यामुळे मद्यप्रेमींना ख्रिसमस आणि नूतनवर्ष धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.
ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टसाठी २४, २५ डिसेंबर तसेच ३१ डिसेंबरच्या रात्री पुणे शहरातील वाईन शॉप मध्यरात्री १ वाजेपर्यंत तसेच बीअर बारला पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम १३९ (ख) (सी), कलम १४२ (२), (एच-ख) (आयव्ही) अन्वये नाताळ आणि नववर्षानिमित्त २४, २५ तसेच ३१ डिसेंबरला राज्यातील मद्यविक्री परवानाधारक वाईन शॉप तसेच बीअर बार रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.












