येरवडा भागातून दुचाकीस्वार तरुणीचे अपहरण करुन तिला मोटारीतून गुजरातमध्ये नेल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. गुजरातमधील गोध्रा परिसरात तरुणीला डांबून ठेवण्यात आले. प्रसाधनगृहात जाण्याची बतावणी करून तरूणीने सुटका करून घेतली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कमल नावाची महिला, तसेच पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी हडपसरमधील मगरपट्टा सिटीत खासगी कंपनीच्या कार्यालयात काम करते. ५ नोव्हेंबर रोजी ती दुपारी अडीचच्या सुमारास विमानतळ रस्त्यावरील संजय पार्क परिसरातून निघाली होती. त्या वेळी तेथून जाणाऱ्या रिक्षाचालकाने दुचाकीस्वार तरुणीला अडवले. पाठीमागून आलेल्या मोटारीतून दोन जण उतरले आणि तरुणीला धमकावून मोटारीत बसण्यास सांगितले. व तेथून थेट गुजरातला एका अज्ञात ठिकाणी नेऊन डांबून ठेवण्यात आले. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहे.












