पुणे : प्रेमप्रकरणातून एका तरुणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. मृत तरुणी इंजिनीयर असून तिच्या प्रियकरानेच तिला संपवले आहे. आयटी नगरी हिंजवडी मध्ये एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. प्रेयसीची हत्या करुन पुण्यात पलायन करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
वंदना दिवेदी असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ निकम याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.आयटी नगरी हिंजवडीमध्ये एका हॉटेलमध्ये ऋषभने प्रेयसीसोबत झालेल्या वादातून तिची गोळ्या घालून हत्या केली. वृषभ आणि वंदना हे दोघेही मूळचे लखनऊचे असून दोघे मागील काही दिवसांपासून हिंजवडी मधील एका हॉटेलमध्ये राहत होते.
रविवारी सकाळी वंदनाची हत्या केली. प्रेयसीची हत्या करून ऋषभ हॉटेलमधून पळून जाताना तेथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. दरम्यान मुंबई पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये तो पिस्तूलसह सापडल्याने त्याला अटक केली आहे. हत्येच्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे.












