पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २६ :
पैसे उसने न दिल्याच्या रागातून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे.सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
निशिकांत काजगर ( वय २१, रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे ) असे फिर्यादीचे नाव असून दोन इसमां विरोधात फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.
फिर्यादी यांचा अंदाभूर्जी विक्रीचा गाडा असून ते आपल्या गाड्या वरती काम करत असताना दोन इसम तेथे आले. त्यांना ५०० रुपये उसनवारी दिली नसल्याचा राग मनात धरून त्यांनी फिर्यादी यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातगाडीवरील साहित्य रस्त्यावर फेकून मोठे नुकसान केले.
तसेच फिर्यादी यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या आईला हाताने मारहाण केली. फिर्यादी यांस तलवारीचा धाक दाखवत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी यांच्या घरासमोर हातातील हत्यार हवेत फिरवत जर कोणी मधे आला तर त्याला जिवे मारीन अशी नागरिकांना धमकी देत दहशत निर्माण केली.
आरोपींवर भादवी कलम ३२३,४५२,५०४,५०६,४२७,३४ म. हा.पो.का.क ३७ ( १ ) १३५, आर्म ॲक्ट ४ ( २५ ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर शेंडे हे करत आहेत.












