पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १० : फोटो फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केली पैशांची मागणी करून फसवणूक केलेल्या तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.अनिल मॅथ्यू आचरीत ( वय २६, रा. फ्लॅट १२०३, सी. विंग, रिव्हर रेसीडेन्सी, जाधववाडी चिखली ) असे आरोपीचे नाव असून एका महिलेने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
आरोपीने फिर्यादी यांना प्रपोज करून त्यांच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.त्यांचे विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे दिल्यानंतर ते पैसे परत केले नाही.तसेच लग्नाचे आमिष दाखवून लग्न न करता फसवणूक केली आहे.
आरोपीवर भादवी कलम ३७६,३७६ ( २ ), ( एन ),३७७,५०४,५०६,४२० अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गिरी हे करत आहेत.












