प्रतिनिधी
दि. १६ : रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत किवळे मुकाई चौकाजवळ निर्माण ग्रुप यांच्या साईटवर दि.०४ रोजी साईट वरील बेसमेन्ट मधील पञ्याचे रुममध्ये राहणारा २१ वर्षीय आरोपी दिनेश रामविलास यादव याने कामगार विवेक गणेश पासवान याला किरकोळ भांडणाच्या कारणावरुन सिंमेटच्या वीटने मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले होते व तो घटना स्थळावरून पसार झाला होता.
सदर घटनेबाबत शिवकुमार घनश्याम प्रजापती वय १९ वर्षे यांनी रावेत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती व त्या अनुषंगाने रावेत पोलिसांनी गु.र.नं. ३२८/२०२३ भा.द.वि.कलम.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे., सह. पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त परदेशी. यांनी गुन्हा उघडकीस आणणे कामी सुचना व आदेश दिले.
सदर गुन्हेचा तपास करीत असताना आरोपी दिनेश यादव हा गुन्हा केल्यानंतर पळून गेल्याचे मार्गाचे सी.सी.टी.व्ही फुटेज पाहिले असता यामध्ये आरोपी हा सेंट्रल चौक देहुरोड येथून एका टॅम्पो मध्ये बसुन मुंबईच्या बाजुस गेल्याचे दिसुन आले. त्यानंतर आरोपी याचे मित्र व जवळचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी करीत असताना दि.०७ रोजी सपोनि / पी. आर. शिकलगार यांना गोपनीय बातमी मिळाली की, सदर आरोपी शिवाजी चौक कल्याण येथे आहे.
अशी माहिती प्राप्त होताच रावेत पोलीस स्टेशन तपास पथक रवाना होऊन सदर ठिकाणी जाऊन आरोपीस शिताफीने पकडून रावेत पोलीस स्टेशन येथे आणले.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेशान्वये व रावेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / पी आर शिकलगार, सपोनि / विशाल जाधव, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र पन्हाळे, पोहवा कोळगे, पोहवा गायकवाड, पोशि नंदलाल राऊन, रमेश तांबे, संतोष तांबे, विजयकुमार वाकडे, रमेश ब्राम्हण, संतोष धवडे व मपोना धाकडे यांनी केली आहे.












