नागपूप : खरं तर, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स नेहमीप्रमाणे भारता काही नवीन शोध घेताना दिसले. यावेळी ते सोशल मीडियावरील नागपूरचा प्रसिद्ध डॉली चायवालाकडे चहा प्यायला गेले. व्हिडिओमध्ये बिल गेट्स डॉली चायवालासोबत चहाचा आस्वाद घेताना दिसत होते. भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकन अब्जाधीश व्यावसायिकाने हा व्हिडिओ पोस्ट करताच तो व्हायरल झाला. व्हिडिओसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी भारताच्या इनोव्हेशन कल्चरचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, भारतात तुम्हाला सर्वत्र नावीन्य दिसेल, अगदी साधा चहा बनवण्यातही.
नागपुरातील सदर भागात जुन्या व्हीसीए स्टेडियमजवळ डॉली चायवालाचे रस्त्याच्या कडेला चहाचे दुकान आहे. बिल गेट्स सोशल मीडियावर लोकप्रिय चहा विक्रेत्या डॉलीपर्यंत पोहोचताच, त्यांनी त्याला चहा देण्यास सांगितले. यानंतर डॉली चायवाला तिच्या खास स्टाइलमध्ये चहा बनवताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी बिल चहाचा आस्वाद घेताना दिसत आहे.












