भारत हा कधीकाळी विश्वगुरू होता. तक्षशिला, नालंदा विद्यापीठाचा व येथील ऋषीमुनीच्या प्रभाव संपूर्ण जगावर होता. मोगल, इंग्रज, निजामाच्या पारतंत्र्यामध्ये या विचाराला बाजुला ठेवून कारकूनी बनविणारे शिक्षण दिले गेले. आजही जगात सर्वात हुशार भारतीय तरूण असल्याचे जागतिक सर्व्हेच्या माध्यमातून समोर आलेले आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा म्हणत मला भारतीय तरूणाची भीती वाटते. जगामध्ये आज बुद्धीच्या जोरावर नवीन शोध लावले, त्यातून आर्थिक साम्राज्य निर्माण करणारे अमेरिकेतील बील गेट्स, स्टिव्ह जॉब, भारतीय राममूर्ती , मुकेश अंबानी यांची नावे होत. आज बुद्धीच्या जोरावर जगावर राज्य करणारे अनेकजण आहेत. त्यामुळे बौध्दिक संपदेचा प्रभाव संपूर्ण जगावर कायम राहणार आहे असे मौलिक विचार भाजपा नेते तथा जेएसपीएम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले.यावेळी ते जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद नॅशनल स्कूल काळेवाडी, रहाटणी येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन अरिन्दम् पॉवर ऑफ एज्युकेशन 2023 च्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोपात बोलत होते.
यावेळी या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश महामंत्री तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर-विक्रांतजी पाटील, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री अनुप मोरे, पुणे महानगरपालिकेचे असिस्टंट कमिशनर गिरीष दापकेकर, डिफेंन्समधील कमांडर रघुनाथ सावंत, पिंपरी महानगरपालिकेचे गटनेते नाना काटे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएम संस्थेचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, निगडी प्राधिकरणाचे नायब तहसिलदार प्रविण उमरणी, गुणवंत कामगार महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त बाळासाहेब साळुंखे, पुणे येथील मराठवाडा विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश इंगोले, गया फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय राठोड, मोहठादेवी ट्रांसपोर्टचे उद्योजक शंकर तांबे,मराठवाडा जनविकास संघ महाराष्ट्र राज्य, पिंपरी चिंचवडचे शहरचे संस्थापक अध्यक्ष अरूण पवार, प्राचार्या पुनम गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ. कव्हेकर म्हणाले की, जगामध्ये अनेक क्षेत्रामध्ये क्रांतीकारी बदल झाले. त्याप्रमाणे कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे वैद्यकीय, कृषी, शिक्षण, अंतराळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. रोबोच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात मानवाचे काम कमी होत आहे. देशाचे पंतप्रधान मा.मोदीजींनी जी-20 परिषदेमध्ये वसुधैव कुटुंबकम् नारा दिला. संपूर्ण जग कुटुंब आहे. अरब देशांच्या अनेक प्रमुखांना परिषदेशी जोडले. त्यामुळे जी-20 ही परिषद यशस्वी झाली. यामुळे भारताचा गौरव जगात वाढलेला आहे, असे मतही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सौ.पुनम गाडेकर यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यासह पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.












