निवडणूक आयोगाने काल राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली २७ फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक पार पाडणार आहे. एकूण ५६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रात ६ जागांचा समावेश आहे. यातील पाच जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. राज्यातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
आगामी निवडणुका आणि जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्य सभेसाठी उमेदवार देणार असल्याचं समजतेय. विनोद तावडे यांच्या रणनितीमुळे बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्याने राज्यसभेसाठी तावडेंचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार आहे.
राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी विधानसभेतील आमदार मतदार असतात, मागील दोन वर्षांत राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यसभेचे खासदार निवडणूक देणाऱ्या आमदार इकडे तिकडे झाले आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत रंगत येणार आहे. महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडे आमदारांची संख्या महाविकास आघाडीपेक्षा जास्त आहे. संख्याबळाचा विचार करता महायुतीला पाच जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला एकच जागा मिळेल. आता पुन्हा मत फुटतील का ? याकडे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी मधील तो एक उमेदवार कोण असेल काँग्रेस सध्या संख्या बळाने शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे गट यांच्या पेक्षा जास्त आहे.












