मुंबई: अखिल हिंदुस्थानी आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेतील मुंबई विद्यापीठ मल्लखांब खेळाच्या सुवर्णपदक विजेत्या संघातील (मुले आणि मुली) खेळाडूंचा ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन
कोळंबेकर, शशिकांत झोरे आणि मिलिंद साटम उपस्थित होते. युवासेनेच्या दणक्यामुळे
विद्यापीठाच्या क्रीडा समितीने संघाची फेरनिवड करण्याचे आदेश रद्द केले. युवासेनेमुळे
फेरनिवडीचे आदेश रद्द झाल्यामुळे खेळाडूंनी आदित्य ठाकरे यांचे आभार मानले.
मुंबई विद्यापीठ मधील मल्लखांब संघाने पटकावले सुवर्ण पदक…












