पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१० : सध्या पुणे शहरात शिवाजीनगर ते हिंजेवाडी पर्यंत मेट्रो उडणंपूल बांधण्याचे काम सुरु आहे. या मार्गा दरम्यान बाणेर रस्त्यावरील ग्रीन पार्क हॉटेल ते पल्लोड फार्म पर्यंत पोर्टल बिम लॉंचिंगचे काम मेट्रो कडून करण्यात आले आहे. त्यामुळे चतु:र्श्रुंगी वाहतूक विभागाकडून दि.१२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत रस्ता बंद करण्यात येणार आहे. बाणेर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत रहावी यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग
पुणे विद्यापीठ चौकातुन – अभिमान श्री कडे – बाणेर फाटा चौकातून उजवीकडे – परिहार चौकातून डावीकडे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून उजवीकडे – नागराज रोड वरून– महाबळेश्वर हॉटेल जवळ – बाणेर रोडवर येऊन नागरिकांना इच्छित स्थळी जाता येईल.
ग्रीन पार्क हॉटेल चौकातून डावीकडे – सोमेश्वर मंदिर मार्गे राम नदी पुलावरून उजवीकडे – पासपोर्ट कार्यालया समोरून बाणेर रोडवर येऊन नागरिकांना इच्छित स्थळी जाता येईल.












