खुनाच्या आरोपाखाली येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव काल पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांना चकवा देऊन आणखी एक कैदी तुरुंगातून पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
२००८ साली वारजे पोलीस स्टेशन येथे खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आशिष जाधवला अटक करण्यात आली होती.
त्यानंतर कोर्टाने ३०२ च्या आरोपाखाली त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. जाधवला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.












