महाराष्ट्र : रामजन्मभूमी अयोध्या येथे राम मंदिराचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यला देशातूनच नव्हे तर जगभरातून वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी येणार आहे. देशभरात प्रभू श्री राम येणार म्हणून उत्सव साजरा केला जात आहे. अनेक राज्यांत शासकिय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील २२ जानेवारीला शासकिय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली होती आता अखेर राज्य सरकारने महाराष्ट्रात राम जन्मभूमीचा सोहळा राज्यभरात साजरा करण्यासाठी २२ तारखेला शासकिय सुट्टी जाहीर केली आहे. २२ जानेवारीला महाराष्ट्रात शाळा, बँक, बंद असतील. अशी बातमी आता समोर आली आहे.
२२ जानेवारीला शाशकीय सुट्टी बरोबरच त्या दिवशी मास व दारु विक्री बंद ठेवावी, अशी मागणी पोलिस प्रशासन व न. प. प्रशासनाला करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये तर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यादिवशी मास व दारु विक्री बंद आहे. तीच मागणी आता विविध संघटनांकडून आता महाराष्ट्रात सुद्धा केली जात आहे. यावरती राज्य सरकारकडून सध्या कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. २२ जानेवारी हा दिवस हिंदूसाठी खूप गर्वाचा दिवस आहे. त्यामुळे त्यादिवशी सर्वांना प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा पाहता यावी यासाठी सर्वांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.












