पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २८ : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आलेली आहे.ही घटना लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.फिर्यादीने अनोळखी इसमाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद केला होता.त्यावेळी एका अनोळखी इसमाने त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने उचकटून त्या वाटे घरात प्रवेश केला.घरातील ४,१८,००० किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.
आरोपीवर भादंवि कलम ३८०,४५४,४२७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.सदर घटनेचा तपास पोलीस उप निरीक्षक अमित गोरे हे करत आहेत.












