पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०६ : इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकारणीची निवड (दि.२) पार पडली. काटी गावचे युवा कार्यकर्ते विकास अर्जुन भोसले यांना कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष युवा नेते सागरबाबा मिसाळ यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री.संजय दुपारगुडे, जिल्हा सरचिटणीस श्री. मालोजी शेंडगे काटी ग्रामपंचायतीचे माजी उप सरपंच व जेष्ठ नेते दत्तात्रय माने,
पक्षाचे निष्ठावंत निवृत्ती भोसले,माजी ग्रा.सदस्य अंकुश शेंडे, अदिनाथ भोसले, काटी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अमित मोहिते, ग्रामपंचायत सदस्य डॉ.अमोल गोरे.ग्रा. सदस्य प्रा.बाळासाहेब लोखंडे, ग्राम.सदस्य प्रा विपुल वाघमोडे, विकास गोरे, माऊली सुतार, शंकर भोसले, गणेश गायकवाड, दिपक गुळवे,अर्जुन भोसले, शिवाजी माने, वसंत भोसले, विलास गायकवाड. विशाल भोसले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात सागर मिसाळ यांनी मार्गदर्शन केले. प्रा .विपुल वाघमोडे यांनी निवेदन केले तर नवनियुक्त कार्याध्यक्ष विकास भोसले यांनी आभार व्यक्त केले.












