पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एलपीजी गॅस सिलिंडर आजपासून म्हणजेच १ डिसेंबर २०२३ पासून, वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून महागला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती सुधारित केल्या जातात.
आजही एलपीजीच्या किमती अपडेट करण्यात आल्या असून डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे.तेल विपणन कंपन्यांनी १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी १६ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक गॅसची किंमत कमी करण्यात आली होती.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसला तरी १९ किलोच्या सिलिंडरच्या किमतीमुळे बाहेर खाणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये मतदान होत झाले असून आता ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असताना व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत दरवाढीचा ग्राहकांना चटका असला आहे.
यापूर्वी १ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली होती, तर १ सप्टेंबर रोजी मोठी कपात जाहीर झाली होती. गेल्या महिन्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या किमती १०३ रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या.












