पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २६ : दैनिक राज्य लोकतंत्र आणि पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने एका व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
आज या व्याख्यान सत्राच्या सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड बार कोर्ट रूम, नेहरूनगर येथे 4 वाजता न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांच्या समकालीन साहित्यातील स्त्री प्रतिमा आणि विचार या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मा . न्यायाधीश पी सी फटाले, प्रियांका सुरवसे,रिना मगदुम, मनाली सावंत, सुजाता कुलकर्णी , साक्षी धुमाळ ,भावना शर्मा, स्नेहा कांबळे मोनिका गाढवे, पद्मावती पाटील काजल वायकर,मोनिका सचवणी,प्रमिला गाढे,कविता ताठे आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे यांच्या संगीताने झाली.यावेळी न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी या स्वामी या कादंबरीतील रमाबाई आणि माधवराव पेशवे याच्याबद्दल त्या कादंबरीतील क्षण,पुरुष या नाटकात अत्याचाराला बळी पडलेली स्त्री याबद्दल बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या आपल्या हातात यांत्रिक उपकरणे आली म्हणजे आपण मॉडर्न झालो असे नाही. सध्या पालक आणि मुलं यांच्यातील संवाद हा संपत चालला आहे. तो संवाद तसाच सुरू ठेवण्यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्न करायला हवेत.
यावेळी त्यांनी एका प्रसिद्ध लेखकाची वडिलांचे मुलीस पत्र ही कविता देखील सादर केली.
ॲड. रायळे या म्हणाल्या की स्त्रीने नेहमी सक्षम असले पाहिजे. तीने झाशीची राणी आणि तिच्यासारख्या बऱ्याच स्त्रियांकडून प्रेरणा घेतली पाहिजे. हे नऊ दिवस वकील भगिनींनी व्याख्यान सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तसेच हे नऊ दिवस आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यान सत्राबाबत त्यांनी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे आणि सगळ्या वकील भगिनींचे कौतुक केले. मा . न्यायाधीश पी सी फटाले यांनी देखील यावेळी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाचे आभार ॲड. मोनिका गाढवे यांनी मानले.












