पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२३ : सदाशिव पेठेतील रस्त्यावर पायी चालत जाणाऱ्या एका जेष्ठ नागरिकाला सांत्वनाच्या बहाण्याने चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवार (दि.१९) रोजी आशीर्वाद बिल्डिंग समोर दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी एका जेष्ठ नागरिकाने फिर्याद दिली असून मझर मुमताज अन्सारी (वय १८ रा. सैय्यदनगर,हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी हे सदाशिव पेठेतील रस्त्यावरून जात असताना आरोपीने दुचाकी वरून येऊन धक्का मारला. क्या अंकल, क्या हो गया, धक्का लगा तो नाराज हो गये क्या असे म्हणत मिठी मारून सांत्वनाच्या बहाण्याने पॅंटीच्या खिशातील रोख रक्कम २० हजार रुपये व कागद पात्राची चोरी केली आहे. सदर आरोपी विरोधात भा.द.वि. कलाम ३९२,३४ अंतर्गत विश्रामबाग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सह.पोलीस निरीक्षक बी.ए नानेकर करीत आहेत.
सांत्वनाच्या बहाण्याने चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला लुटले












