पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : साईट वर सुरू असलेले काम बंद पाडत अतिक्रमण केल्याची घटना समोर आली आहे.ही घटना चिखली येथील रुपिनगर परिसरात घडली आहे.
गंगाधर रमेश भालेकर ( वय ४०, भैरोनाथ हौसिंग सोसायटी,रूपिनगर ) यांनी ११ महिला व ५ पुरुष यांच्याविरुद्ध चिखली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
दि. २३ रोजी फिर्यादी हे त्यांच्या ऑफिस मध्ये बसले होते.त्यावेळी साईटचे काम चालू असताना स्वाती कांबळे नामक महिला तिच्यासोबत १० महिला व ५ पुरुष घेऊन आली आहे. त्यांनी साईट वर सुरू असलेले काम थांबवले असल्याची माहिती वॉचमनने फिर्यादी यांना दिली.फिर्यादी हे पाहणी करण्यास गेले असता तुम्ही काम थांबवा, हा प्लॉट माझा आहे, नाहीतर मी सदर ठिकाणी आत्मदहन करेल अशी धमकी आरोपीने दिली.तसेच अतिक्रमण करून शिवीगाळ केली आहे.
आरोपींवर भादवि कलम १४१,१४३,१४९,४४७,५०४,५०६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आले नाही.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कुदळे हे करत आहेत.












