पिंपरी : हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. शेतकऱ्यांचे जर प्रश्न सोडवायचे असतील व्यवसायिकांनी हवामान बदलावर सौरचनात्मक काम केले पाहिजेत.यासाठी उद्योजकांनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्लास्टिकचा कमीत कमी वापर केला पाहिजेत. व्यवसाय आणि चिरंतर विकास या वेगवेगळ्या बाबी असल्या तरी दोघांनी आता एकत्र येणे काळाची गरज आहे. एकत्र न आल्यास पर्यावरण किंवा हवामान बदलाचे प्रश्न मार्गी लागणार नाही. ग्रामीण भागातील समस्या जाणून घेऊन त्यावर संशोधन करणे हेच चिरंतर विकासाचे मॉडेल ठरेल.असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.
आकुर्डी येथील डॉ.डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि इन्स्टिट्यूट ऑफ़ इंडस्ट्रियल ॲंड कंप्युटर मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च (आयआय सीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले दोन दिवशीय एशिया- आफ्रिका डेव्हलपमेंट आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.योगेश जोशी, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास प्रकल्प संचालक शालिनी कडू, येस बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष कर्नल सुनील अरविंदन, डॉ.जे.जी पाटील, प्रा डी आर करनुरे, डीवायपीआयएमएसचे कार्यकारी संचालक डॉ.भरत चव्हाण पाटील, सुप्रिया चव्हाण पाटील, श्वेता चव्हाण,संचालक डॉ.कुलदीप चरक, इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कम्प्युटर मॅनेजमेंट अँड रिसर्च चे संचालक डॉ. अभय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सौ.कडू यांनी ग्रामीण भागातील महिला स्वयंरोजगारच्या माध्यमातून सक्षम होत आहे. राहणीमान उंचावत आहे. असे सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे सांगितले.
डॉ जोशी म्हणाले कि, आपल्याकडे असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर उपयोग करून घेतल्यास देश जगात राज्य करेल.
या परिषदेमध्ये देश विदेशातून १३० शोधनिबंध सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मीनल वाघ यांनी तर आभार डॉ.अविनाश पवार यांनी मानले.
उदघाटनानंतर घेतलेल्या चिरंतन विकासामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका या विषयावरच्या चर्चा सत्रात डॉ मनीषा कुलकर्णी,मोहिनीराज खोडदे,डॉ प्रदीप आंबवणे, जिगर उंदाविया, महेश लोहार, रोहित घोष यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ कुणाल पाटील, डॉ नितीन झावरे,डॉ कविता सूर्यवंशी,डॉ नीतू उदगीरकर, डॉ अमिताभ पटनाईक,प्रा समाधान जाधव यांनी संशोधन पत्रिकेचे मुल्यमापनाचे काम पाहिले.











