पुणे : चाकण पोलीस स्टेशन मधील कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार बाबुराव मानसिंग राठोड यांचे (ब्रेन हॅमरेज) मेंदूतील रक्तस्त्राव झाल्याने तसेच हदविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे.
चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी हे दिलेल्या माहितीनुसार राठोड हे सोमवारी रात्रीच्या ड्युटीवर असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते .त्यानंतर त्यांना चाकण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना प्रथम दर्शनी हार्ट अटॅक व ब्रेन हेमरेज झाला आहे. असे सांगितले त्यानंतर त्यांना उपचार साठी पुणे येथे पाठवण्यात आले तेथे त्यांचा सोमवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.












