मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त आरोग्य तपासणी
मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त परिषद संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन रविवार दि. ३ डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य अध्यक्ष शरद पाबळे यांच्या हस्ते लोकमान्य कॅन्सर बिल्डिंग , रेल्वे पुलाशेजारी , चिंचवड येथे सकाळी ९ .३० वाजता पार पडणार आहे . यावेळी लोकमान्य कॅन्सर केअर सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल क्षीरसागर व सहकारी डॉ .सहदेव गोळेंसह तज्ञ महिला डॉक्टर मार्गदर्शन व तपासणी करणार आहेत. या शिबिरात सर्व प्रकारच्या व्याधीवर आयुर्वेद तपासणी , जनरल तपासणी , BP / BMI / BSL & R / Height And Weight / Pulse / ECG तसेच महिलांसाठी मोफत स्तनाच्या कर्करोगाची पूर्व तपासणी ( IBE & CBE ) आधुनिक तंत्रज्ञान द्वारे सर्व प्रकारच्या कॅन्सरची तपासणी शिबीरात करण्यात येणार असुन , महिला तज्ञांमार्फत वेदना रहित तपासणी होणार आहे .
पिंपरी – चिंचवड पत्रकार संघाचे सर्व सदस्य व शहरातील दैनिक , साप्ताहिक , ऑनलाईन चॅनेलच्या सर्व पत्रकारांनी धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष परिवाराचेही संतुलन बिघडवतो आहोत हे लक्षात घेत सहकुटुंब या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी केले आहे .












