
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने येणारे मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज वाशीत चर्चा केली. त्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील सध्या मराठा समाज बांधवांना संबोधित करीत आहेत.
यावेळी संबोधित करताना त्यांनी सांगितले की, सरकारने आतापर्यंत 37 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरती केले आहेत. ते कुणाला दिले याचा अहवालच मागितला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
कुणबी प्रमाणपत्र वाटपात राज्यातील प्रशासकीय विभागांपैकी कोकण (6,79,048) , नाशिक (11,76,152) अमरावती (10,66,331) आणि नागपूर जिल्ह्यात (8,71,837) सर्वाधिक कुणबी प्रमाणे वितरित झाली आहेत. मनोज जरांगेचा भाग असलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात अवघी 23 हजार 290 प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. त्यानंतर पुणे विभागात 77 हजार 733 प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत.
20 जानेवारी 2024 अखेर राज्यामध्ये आतापर्यंत एकूण 57 लाख 41 हजार 241 कुणबी नोंदी आढळल्या आहेत. स्कॅनिंग झालेल्या नोंदणीची संख्या 31 लाख 29 हजार 1 इतकी आहे. वेबसाईटवर अपलोड केलेल्या नोंदणीची संख्या 21 लाख 16 हजार 650 आहे, तर आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्राची संख्या 38 लाख 97 हजार 391 इतकी आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार नाशिक विभागामध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 2 लाख 88 हजार 665 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात 3 लाख 37 हजार 106 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आलं आहे. जळगाव जिल्ह्यात 3 लाख 56 हजार 942 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आलं आहे. धुळे जिल्ह्यात 1 लाख 70 हजार 933 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आलं आहे, तर नंदुरबार जिल्ह्यात 22 हजार 506 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
राज्य सरकारने मनोज जरांगे यांना सादर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यांमध्ये सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्रांची अमरावती विभागातील बुलढाणा (4,40,361), कोकण विभागातील रत्नागिरी (4,04,066) नाशिक विभागातील नगर जिल्ह्यात (3,37,106) आणि जळगाव जिल्ह्यात (3,56, 942) सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आलं आहे. या चार जिल्ह्यात 37.94 लाखांपैकी 15 लाख 38 हजार 475 कुणबी प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली आहेत. मराठवाडा विभागातील हिंगोली, नांदेड, लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झालं आहे.
नाशिक विभागानंतर दुसऱ्या क्रमाकाच्या सर्वाधिक नोंदी अमरावती विभागामध्ये सापडल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात 2 लाख 4 हजार 474 प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. अकोला जिल्ह्यात 1 लाख 46 हजार 950 प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 1 लाख 61 हजार 539 प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत. बुलडाणा जिल्ह्यात 4 लाख 40 हजार 361 प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत, तर वाशिम जिल्ह्यात 1 लाख 13 हजार 7 कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. असे मिळून दहा लाख 66 हजार 331 प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी पत्र वाटप ?
मुंबई शहर 4046
मुंबई उपनगर 19560
ठाणे एक लाख 114079
पालघर 41491
रायगड 90009
रत्नागिरी 404066
सिंधुदुर्ग 5797
पुणे 48060
सांगली 1953
सातारा 1430
सोलापूर 2012
कोल्हापूर 24278
नाशिक 288665
अहमदनगर 337106
जळगाव 356942
धुळे 170933
नंदुरबार 22506
छत्रपती संभाजी नगर 3482
जालना 2802
परभणी 2477
हिंगोली 316
नांदेड 842
बीड 9752
लातूर 310
धाराशिव 3309
अमरावती 204474
अकोला 146950
यवतमाळ 161539
बुलडाणा 440361
वाशिम 113007
नागपूर 272898
वर्धा 162233
भंडारा 120479
गोंदिया 72883
चंद्रपूर 186790
गडचिरोली 59554












