सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक प्रकरणात ट्रायल कोर्टने केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. सुनील केदार यांनी यानंतर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, मात्र तिथे त्यांच्या पदरी निराशा आली. मात्र नागपूर उच्च न्यायालयाने सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केला.
सर्व बाबींचा विचार करून सुनील केदार यांना जामीन मंजूर केला जात आहे, असा आदेश न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठाने दिला. सुनील केदार यांना एक लाख रुपये मोबदल्यात जामीन मंजूर केला आहे. सुनील केदार यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला न्यायालयात हजर व्हायचे आहे.
दरम्यान, नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी दोषी ठरवत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनिल केदार यांना २२ डिसेंबर २०२३ रोजी ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर जामिनासाठी केदार यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.












