प्रशासकीय राजवट लागल्यानंतर पाच महिन्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना, तर त्यानंतर महायुतीच्या नेत्यांना अर्थात मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रींना वेळ मिळत नसल्याने अनेक प्रकल्प सुरू झालेली नाहीत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक आहेत. मात्र, विविध विकास प्रकल्प तयार होऊनही शेऱ्यावादाच्या राजकारणात आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना वेळ मिळत नसल्याने रस्ते सफाई गाड्यांचे, एअर पुरिफिकेशन फाउंटनचे उद्घाटन रखडले आहे. त्यामुळे शहरवासीयांना दूषित हवेत राहावे लागत आहे व रस्तेही साफ होत नाहीत.
पिंपरी चिंचवड महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे सगळ्याच कामांवर शासकीय वर्चस्व आहे. नाट्यसंमेलनाच्या व राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने दोन दिवस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व इतर पक्षांचे ही ज्येष्ठ नेते शहरात होते. मात्र, शहरात प्रकल्पाच्या कामांना वेळ कधी मिळणार असा प्रश्न शहरातील सुजाण नागरिक उपस्थित करत आहे.
कोणत्या कामांचे राहिले उद्घाटन
यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई एअर पुरिफिकेशन फाउंटनच निगडी केवळ उड्डाणपूल यासह विविध कामे पूर्ण झाली असून ती फक्त उद्घाटना अभावी कडून आहेत शहरातील प्रदूषण वाढले आहे तरीही अधिकाऱ्यांना व राजकीय नेत्यांना याचे गांभीर्य नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरातील आमदारांना पालकमंत्री अजित पवार यांच्या ऐवजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रींच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. त्यांची मर्जी राखण्यासाठी अधिकारीही वेळ घेण्यासाठी थांबले आहे. मात्र, या तिघांचीही एक वेळ मिळत नाही. त्यामुळे विकास कामांच्या उद्घाटनाला मुहूर्ताची तारीख मिळत नाही. आमदारांच्या पायी शहरवासीयांना वेठीस धरण्याचा प्रकार महापालिकेकडून होत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहेत.












