विमाननगर परिसरातील एका हॉटेलमधील वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत राजस्थानी अभिनेत्रिसह उझबेकिस्तान मधील दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर दोन दलालांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विमाननगर पोलीस ठाण्यात इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन सन्यासी आणि रोहित (पूर्ण नाव पत्ता महित नाही) यांच्या विरुद्ध आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस हवालदार मनिषा सुरेश पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.16) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास निको गार्डन रोडवरील एका हॉटेलच्या खोलीत करण्यात आली.
विमाननगर येथील निको गार्डन रोडवरील हॉटेल इंटरनॅशनलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर हॉटेलमधील दोन रुममध्ये छापा टाकून उझबेकिस्तान आणि राजस्थान येथील तीन तरुणींना ताब्यात घेतले. सुटका करण्यात आलेल्या तरुणींपैकी एक तरुणी राजस्थानी अभिनेत्री असल्याचे तपासात समोर आले आहे.












